Marathi drama small Natak script , stories, 2022

 Marathi drama small Natak script/माराठी नाटक, स्टोरी

Marathi drama small Natak script/माराठी नाटक, स्टोरी

1) राजा आणि मंत्री

Marathi drama small Natak script – एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, “महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही” सम्राट म्हणाले,”अहो! हिशोबात काही चूक असेल.” मंत्री म्हणाले,”हिशोब अचूक आहे. मी स्वत:तपासला आहे.” सम्राट म्हणाले,” रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा.” परंतु मंत्री म्हणाला,” उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे.” आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,”महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले.” यावर राजा म्हणाला,”जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा.” सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.

2) शेडजी आणि त्याचा मित्र

एका शेठजवळ अपार संपत्‍ती होती, एके दिवशी त्‍याच्‍या मनात विचार आला की एक भव्‍य शिवमंदिर बनवावे. सहा महिन्‍यात मंदिर बनवून पूर्ण तयार झाले. मंदिर बनवून जे धन शिल्‍लक राहिले ते धन त्‍याने मंदिराच्‍या घुमटात गुप्‍त रितीने ठेवले. या गोष्‍टीचा उल्‍लेख त्‍याने आपल्‍या डायरीमध्‍ये करून ठेवला. त्‍यानंतर तो तीर्थयात्रेला निघुन गेला. परंतु तो रस्‍त्‍यातच मरण पावला. शेठला चार मुले होती. शेठजीच्‍या मृत्‍युनंतर काही दिवसातच त्‍यांना पैशाची चणचण भासु लागली, तेंव्‍हा त्‍यांनी आपल्‍या वडीलांची डायरी तपासायला सुरुवात केली. त्‍या डायरीत त्‍यांना घुमटातल्‍या धनाचा उल्‍लेख असलेली नोंद त्‍यांना पाहायला मिळाली. त्‍यात असेही लिहीलेले होते की, चैत्र शुद्ध नवमीला धन घुमटात ठेवण्‍यात आले आहे, त्‍या मुलांनी घुमट तोडला मात्र त्‍यात धन निघाले नाही.

तेव्‍हा ते आपल्‍या वडिलांच्‍या बुजुर्ग मित्राकडे आले, आणि समस्‍या सांगितली. वडीलांच्‍या त्‍या बुजुर्ग मित्राने त्‍या चारही मुलांना चैत्र शुद्ध नवमीला रात्री बारा वाजता त्‍या ठिकाणी खोदायचे आहे जिथे तुमच्‍या वडीलांनी धन ठेवले आहे असे सांगितले, चंद्राच्‍या प्रकाशात घुमटाची सावली जेथे पडली होती, तेथे रात्री या म्‍हाता-या व्‍यक्तिने खोदायला स्‍वत: आधी सुरुवात केली आणि मग मुलांना खोदायला सांगितले. जेथे सावली पडली होती तेथेच बरोबर धन सापडले, मुलांना आनंद वाटला. मुलांनी बुजुर्ग व्‍यक्तिला धन्‍यवाद दिले, त्‍या धनाच्‍या मदतीने मुले व्‍यापारात पुन्‍हा उभे राहिले तसेच आपल्‍या पित्‍याच्‍या बुद्धीलाही दाद दिली.

3) मासा आणि हंस

एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,”तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस” हंस म्हणाला,”अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात.

कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते.” हे ऐकून मासा म्हणाला,”मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे.” मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,”येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच.” त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला. त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.

Leave a Comment