मित्रांनो, येथे तुम्हाला काही लोकप्रिय मराठी प्रेम कविता दिल्या आहेत. या सर्व कविता प्रेमाची जाणीव करून देतात.Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi ज्या कवींनी ही प्रेमकविता हिंदीत रचली आहे. तुम्हाला त्यांच्या कविता वाचायला आवडतील.
हे आपण अनेकदा ऐकले आहे. प्रेमाची व्याख्या नसते. आणि विद्वानांचे मत आहे की प्रेमाची अनुभूती इतकी गोड असते की तिच्यासमोर जगातील सर्व गोडवा मावळलेला दिसतो. काही लोक विश्वास ठेवतात. प्रेम समजून घेणे प्रत्येकाच्याच जिकिरीचे नसते.
अशी भावना आहे. त्यात अचानक ढगांचा गडगडाटही होतो. मग अचानक शांतताही येते. अचानक आनंदाचा पाऊस सुरू होतो. तर कधी अचानक अश्रूंचे पाणी वाहू लागते. जगाची ती आनंदाची अनुभूती आहे. ज्यामध्ये कधी कधी असमान मध्ये उडताना जाणवते. तर कधी कधी मला धरमवरून खाली पडल्यासारखे वाटते.
prem kavita marathi
दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो
माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
Love poem In marathi
प्रेम कधी रुसण असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतसुद्धा!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं- मंगेश पाडगावकर
आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम
प्रेम कविता SMS Marathi
कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद
गुलाबाचं फुल देणं
प्रेम असतं
पाकळीसमान तिला जपणं
प्रेम असतं,
तिला हसवणं म्हणजे
प्रेम नसतं
तिच्या सुखासाठी आपलं हसणं
प्रेम असतं,
तिला नेहमी सावरणं
प्रेम नसतं
सोबत राहून साथ तिची देणं
म्हणजे प्रेम असतं
खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून
जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
प्रेम कविता चारोळ्या
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून
“मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!”
अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले…. 🙂
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..
अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नाना
तू कधि उत्तर दिले नाही….
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
मराठी कविता प्रेमाच्या आठवणी
अस कस?
तुझ वागणं
मझ्यावर रुसणं
अन खुद्कन हसणं
असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार
असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं
असतं प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो प्रेमात
गुलाम असतो …
पण राबवायचा नसतो
प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं
असतं पण दुसऱ्याशिवाय
शक्य नसतं कळत नकळत
कसं होतं ते मात्र कधीच
कळत नसतं…
असं फक्त प्रेमच असतं
असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ………
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ………..
पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे
आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर…..
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर……
पहिलं प्रेम मराठी कविता
आज ही माझी सकाळ
तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे
माझी सर्व रात्र जाते
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील…
आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा
आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.
आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !
आपली पहीली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेऊन गेली.
आयुष्यभर ह्रदयाची,
बनून राह राणी…
तू ह्रदयात असता ,
हवं काय आणि…
आयुष्यात माणसाला,
बरंच काही मिळतं,
बरंच काही हरवतं,
जेंव्हा प्रेम होतं.
आवडलं कुणी तर वेड होऊन जावं
झपाटल्यासारखं प्रेम करावं
बेधुंद होऊन तिच्यावर मरावं
फुलासारखं तिला जपावं
तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं
तिची ढाल बनून आयुष्य जगावं
फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं
आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं
तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं
प्रेमानेच तिचही मन जिंकाव
आश्रू हि प्रेमाची मौन
भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू
डोळ्यातून बाहेर येतात ….
ह्याचा अर्थ
तुम्ही अडचणीत आहात
पण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू
येतात ………. ह्याचा अर्थ
तुम्ही प्रेमात आहात
आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस
संपून जातो,
ओठांपर्यंत येते तुझे नाव,
स्वप्नांच् याच जगात राहू दे
मला असे तू परत परत
सांगून जातो
इतकेही प्रेम करु नये
कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल
उभा मी शांत आज ,
तूझ्याकडे पाहत…
समोर माझ्या एक फुल ,
नुकतच होतं फुलत…
ऋतू बदलत जातात
दिवस उजाडतो,मावळ्तो
सागरालाही येत राहते
ओहोटी आणि भरती
बदलत नाहीत ती
फ़क्त माणसा माणसांमधली
अनमोल नाती…… प्रेमाची
एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
प्रेम करण्यासाठी.आणि,
आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी
विरह कविता मराठी
एकटेपणा तेव्हा वाटत नाही…
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो…
जेव्हा आपल्या बरोबर
सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या
बरोबर हवी असते
एका इशाऱ्याची गरज असेल
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर
भेटेन,
जिथे तुला आधाराची गरज असेल….
एकांत क्षणी…कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.
एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात….
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात….
तिला कळतच नाही
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे
कधी इतकं प्रेम झालं….
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस….
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.
कळू दे प्रेम जरा ,
तुझ्याही ह्रदयातले…
सोपे होईल मग मलाही ,
सांगणे मनातले…
कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत………..कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते तिच्या सहवासात राहण्याची आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच
कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले……
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले……
का तुझ्या माझ्या नात्याला ,
प्रेमाचे नाव द्यावे …
नुसतं नावानेच काय त्याला ,
प्रेमाचे भाव यावे …
का विसराव मी तीला का विसराव तीने मला
जीने माझ्या कवि मनाला आपल्या प्रेमातून जन्म दिला
काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत
दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत
काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो
काही नाती जोडली जातात,
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !
कुसुमाग्रज प्रेम कविता marathi prem kavita kusumagraj
प्रेम म्हणजे काय असतं……. ♥
चातकाला पावसाशी असतं,
टापोर्या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असत.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे चंद्राला चांदन्यांशी असत,
इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असत,
सळसळणार्या वार्याला गर्जणार्या ढगांशी असत.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे फुलपाखराला फुलाशि असतं,
काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणनार्या पतंगाला मीनमिनत्या दिव्याशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जस सुखाला दुःखाशी असतं,
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे हळूवार जपायाच असतं,
हृदयात साठवून ठेवायच असतं,
कितीही दुःख झाल तरी हसत जगायाच असतं,
प्रेम म्हणजे काय असतं.
जे फक्त शेवटपर्यंत…
तिच्यात आणि आपल्यात असत
त्याच्यात आणि आपल्यात असत
एकतर्फी प्रेम कविता | Ektarfi kavita | Sad Love Poem in Marathi
आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत,
खरचं तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत…!
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नातं होत,
नंतर मात्र तिच
वागण बोलण मला आवडत गेल होत…
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत…!
एके दिवशी सकाळी
तिला माझी बनशील का असं विचारल होत…?
तिने मात्र उत्तर न देताच
निघण पसंत केल होत…
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत…!
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर
नाही अस दिल होत,
मैत्रीच नातं मात्र पुढे चालु ठेवीन
अस सांगितल होत…
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत…!
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष
प्याव लागत होत,
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान
मानाव लागत होत…
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत…!
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत,
पण तिला दोष लागेल म्हणुन
तेही जगावं लागत होत…
आयुष्यात पहील्यांदा कोणीतरी मनापासुन आवडलं होत…….!
इतरांसाठी मात्र माझ प्रेम एकतफी॔ होत,
पण मी मात्र तिच्यासाठी
प्रेम साठवुन ठेवल होत…….!
काल जीवनाची झलक पाहिली,
वाटेत ती मला गुणगुणत होती,
मग इकडे तिकडे शोधा
ती हळूच हसत होती,
बर्याच दिवसांनी मला एक करार मिळाला,
ती मला झोपायला लावत होती
आपण दोघे एकमेकांवर का रागावलो आहोत
मी त्याला आणि तिला समजावत होतो,
मी विचारले – एवढी वेदना का दिली
तुला संभोग,
ती हसली आणि म्हणाली – मी वेडी आहे
कसे जगायचे ते मी शिकवत होतो.
आयुष्यातले काही काळत नाही
कधी कधी दिवाही शांत जळत नाही
सावली देणारेच करतात करार उन्हाशी
पाझरणारे डोळेच खेळतात जीवाशी
सोबत असणारेच तसे दूर असतात
पाऊलवाटच गुरफटून टाकतात
वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नसते
नियतीचे गणित कधी मांडता येत नसते
आयुष्यात तसे नसते काही बेतलेले
आयुष्य एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेले
Marathi Kavita On Life | positive marathi poems on life