Skip to content

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023.Pradhan Mantri fasal Bima Yojana (PMFBY)

 प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ मिळेल

दर वर्षी शेतकऱ्यांना  नेसर्गिक आपती मुळे मोठे आर्थिक नुकसान होते . पाऊस पडून.महापूर.चक्रीवादळ.अनेक अशा संकटांशी शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्या साठी सरकारने एक योजना सुरू केली आहे,

या योजनेच्या सहभागाने शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी २ टक्के प्रीमियम आणि रब्बी पिकांसाठी १.५% प्रीमियम भरावे लागते. या योजना आतर्गत पासून ज्या शेतकऱ्याला  नैसर्गिक आपत्तींमुळे खराब झालेल्या पिकांसाठी खूप कमी विमा प्रीमियम ठेवण्यात आला आहे. यामुळे पीएमएफबीवाय योजना आतर्गत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल

 

पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये

पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आहे. या योजने आंत्रगत सर्व शेतकरी या योजने मध्ये सहभागी होऊ शकतो . शेतात  नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

 

पीक विमा योजनेचे उद्देश्य –

शेतकऱ्यांना नेसार्गिक आपती मुळे नुकसान झाले असल्यास त्यांना आर्थिक मदत देणे

शेतकऱ्यांची शेतीतील अभिरुची कायम ठेवण्याबरोबरच त्यांना एक निश्चित उत्पन्न उपलब्ध करणे.

शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक प्रयोग व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

कृषी क्षेत्रात कर्जाची उपलब्धता निश्चित करणे.

 

 पीक  विमा योजना साठी कसा करणार अर्ज व कोठे मिळतात फॉर्म ?

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) साठी ऑफलाइन (बँकेत जाऊन) आणि दुसरे ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल. – http://pmfby.gov.in/

जर तुम्ही फॉर्म ऑफलाइन भरणार असाल तर जवळच्या बँक शाखेत जाऊन पीक विमा योजनेचा (PMFBY) फॉर्म भरु शकता.

 

पीक विमा  योजनेसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता ?

– शेतकऱ्याचा एक फोटो

– शेतकऱ्याचे आयडी कार्ड (पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस, मतदान आयडी कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड)

– शेतकऱ्याच्या एड्रेस प्रूफ (ड्रायव्हिंग लायसेंस, मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड)

 

– जर शेत तुमच्या मालकीचे असेल तर सात-बारा उतारा/ खाता नंबर आदि पेपर सोबत ठेवा.

– शेतात पिकांची पेरणी झालेली आहे, याचा पुरावा सादर करावा लागेल.

– पिक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्र सादर करू शकतो.

– जर शेत कसायला घेतले असेल तर व पीक पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी सोबत आणावी लागेल.

 

पिक विमा योजना म्हणजे काय?

शेतकऱ्यांना नेसरगिक आपती मुळे शेतकऱ्याला जर नुकसान जाले असल्यास त्यांना विमा देणे.

 

पीक विम्याचा हप्ता कसा मोजला जातो?

प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यासाठी विम्याची रक्कम शेतकऱ्याने विम्यासाठी प्रस्तावित केलेल्या अधिसूचित पिकाच्या क्षेत्राच्या गुणाकाराने प्रति हेक्टर वित्त स्केलच्या बरोबरीची असेल .

 

Pmfby अंतर्गत रब्बी पिकांसाठी प्रीमियम दर किती आहे?

रब्बी पिकांसाठी विमा दर 1.5%आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *