गणेश चतुर्थी आरती आहेत त्या मी लिहिल्या आहेत वाचा . आपल्या प्रत्येक सणाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आराधनेने होते. गणपती आरती ही भक्तांच्या मनात विशेष स्थान मिळवणारी प्रार्थना आहे. श्री गणपतीला अर्पण केलेली ही आरती केवळ भक्तीभाव व्यक्त करत नाही तर जीवनातील अडथळे दूर करण्याची शक्तीही देते.जर तुम्हाला हवे असल्यास आमच्या कडे गणेश चतुर्थी शुभेच्छा 2025 तुम्ही ते पण पाहू शकता.
गणपती आरती 5 मराठीत | Ganpati Aarti in Marathi
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
॥ श्री विठ्ठलाची आरती ॥
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा।।1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा।। रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।।धृ.।। तुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं।
देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।।जय.।।2।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां। राई रखुमाई राणीया सकळा। ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ।।जय.।।3।।
ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती।
दिंड्या एताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णांवा किती ।।जय।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवाळिती।।
जय देव जय देव जय. ।।5।।
॥ श्री शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडीं माळा । वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओंवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु.॥ कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा । जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्यीं सागरमंथन पैं केलें । त्यामाजीं अवचित हलाहल जें उठिलें । तें त्वां असुरपणें प्राशन केलें । ‘नीलकंठ’ नाम प्रसिद्ध झालें || जय० || ३ || व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी। शतकोटीचें बीज वाचे उच्चारी। रघुकुलतिलक रामदासाअंतरी ॥ जय देव० ॥ ४ ॥
|| देवीची आरती ||
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
|| घालीन लोटांगण वंदीन चरण. ||
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। मंगलमुर्ती मोरया ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।